जळगाव महापालिकेसाठी मतदानास प्रारंभ

0

जळगाव । जळगाव महापालिकेसाठी आज सकाळी साडेसात वाजेपासून मतदानास प्रारंभ करण्यात आला आहे. यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे.

जळगाव महापालिका निवडणुकीसाठी शहरात ४६९ केंद्रावर ३ लाख ६५ हजार ७२ मतदार हे निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले ३०३ उमेदवारांना मतदान करणार आहे. रात पुरूष मतदारांची संख्या १ लाख ९३ हजार ४०९ आहे. तर महिला मतदारांची संख्या १ लाख ७१ हजार ६३७ असून इतर मतदारांची संख्या २६ आहे.

शहरात ४६९ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यापैकी ३०० मतदान केंद्रावर १ मतदान केंद्रावर १ मतदान केंद्र अधिक्षक, ३ मतदान अधिकारी, १ मनपा शिपाई, १ पोलिस कर्मचारी आहे. तर उर्वरीत १६९ मुस्लीम परिसरातील मतदान केंद्रावर १ मतदान केंद्र अधिक्षक, ३ पुरुष मतदान अधिकारी, १ महिला मतदान अधिकारी, १ मनपा शिपाई, १ पुरुष व १ महिला पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

मतदान प्रक्रियेसाठी ५५० कंट्रोल युनीट असणार आहे. यात ४६९ मतदान केंद्रावर ४६९ कंट्रोल युनीट मतदान केंद्रानुसार दिले आहे. तर उर्वरीत यंत्र हे कोणत्या केंद्रावर यंत्र बिघाड झाल्यास तिथे वापरले जाणार आहे. तसेच २ हजार १०० बॅलेट युनीट पैकी १५०० बॅलेट युनीट हे कर्मचार्‍याना दिले असून उर्वरीत अतिरिक्त म्हणून ठेवण्यात आले आहे.

मतदान साहित्य व कर्मचार्‍यांना नेणे व मतदान झाल्यानंतर मतमोजणीच्या ठिकाणी परत आणण्यासाठी ३६ एसटी बस, १४ लक्झरी बस, २७ मिनी बस, ३४ टेम्पो ट्रॅव्हल्स, ५९ बोलेरो, १९ शासकीय वाहने, ९ राखीव वाहन असे १८९ वाहने असणार आहे.