जळगाव मुख्यालयातील चार पोलिस निलंबीत

0

जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कारवाईने खळबळ

जळगाव : पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे जिल्हा न्यायालय परीसरातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात चोरी झाल्याचा ठपक ठेवत चौघा पोलिसांना जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी सोमवारी निलंबित केल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. हवालदार राजेंद्र भिका चव्हाण, प्रवीण शंकर वाघ, राजेंद्र प्रताप दोडे व राहुल अरुण पारधी अशी निलंबीत कर्मचार्‍यांची नावे आहेत.