जळगाव – टीव्हीचा आवाज वाढवला म्हणून भाच्याला सरोट्याने अंगावर चटके दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आले आहे. शहरातील शासकीय विश्रामगृहातील कर्मचारी क्वार्टवरमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी मामाविरुद्ध रामानंद नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकडी येथे अल्पवयीन मुलांना मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असतानाच जळगावातील अजिंठा विश्रामगृहाच्या क्वार्टवरमध्ये अशीच एक चीड आणणारी घटना घडली आहे.
घरामध्ये टीव्हीचा आवाज वाढवला म्हणून १० वर्षीय भाच्याला मामाने सरोटा तापवून हातावर आणि पायावर चटके दिले. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या काकाने दिलेल्या फिर्यादीवरुन मुलाच्या मामाविरूद्ध रामानंद पोलिसांत कलम ३२४ तसेच कलम २३ ज्यूवेनाईल जस्टीस ऍक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्षुल्लक कारणांवरुन लहान मुलांवर अत्याचार करण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यावर अंकुश लावण्यासाठी दोषींवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.