सुकाणू समितीतर्फे शेतकर्यांना आवाहन
नंदुरबार । जळगाव येथे २६ सप्टेंबररोजी राज्यव्यापी शेतकर्यांचे आंदोलन होत असून यात शेतकर्यांना कर्ज माफी व हमी भाव मिळावा तसेच शेतकर्यांच्या विविध प्रश्न बाबत दाद मागण्यात येणार आहे या शेतकरी परिषदेला जिल्ह्यातून शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी स घटनेची सुकाणू समितीतर्फे राज्यव्यापी भव्य संपूर्ण कर्ज मुक्ती व हमी भाव परिषद जळगांव येथे नूतन मराठा महाविद्यालयात आयोजन करण्यात आले आहे. राज्य परिषदेला येण्यासाठी महात्मा फुलेच्या गांवापासून दि १५ सप्टेंबर पासून जागर यात्रा निघाली आहे तसेच जिल्ह्यात तालुकास्तरावर बैठक घेऊन शेतकर्यांना परिषदेस उपस्थितीची आवाहन करण्यात येत आहे. या शेतकरी परिषदेला रघुनाथ दादा पाटील, खा. राजू शेट्टी, डॉ. बाबा आढाव, आ. बच्चू कडू, डॉ. अजित नवले, प्रतिभाताई शिंदे व सर्व सुकाणू समिती सदस्य महाराष्ट्र उपस्थित राहणार आहेत.
स्वामीनाथन आयोगानुसार उत्पादन खर्च द्या
राज्यातील सर्व शेतकर्यांचे आज पर्यंतचे सर्व प्रकारचे नियमित व थकीत सर्व कर्ज माफ करा व ७/१२ कोरा करा, कर्ज माफीत पीक कर्ज, शेती औजार, सिंचन सुविधा सारखी सर्व शेती पूरक कर्ज, मध्य मुदतीची कर्ज, सावकारी कर्ज, मैक्रोफायनांस, पतसंस्था, अर्बन बँक, बचत गट, विविध महामंडळाची कर्ज, शेतकरी पाल्यांच्या शिक्षणासाठी काढलेले शैक्षणीक कर्ज या सर्वसह शेतकर्याच्या आजवरच्या कर्जाचा समावेश करा. शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत यासाठी शेतीमालाला स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के इतका नफा देत हमी भाव देण्यात यावा व स्वामिनाथन आयोगाचा शिफारशींची अमंलबजावणी करा. कसत असलेले गाय रान व नवजमिनी कसणार्यांच्या नावे करा, व तात्काळ ७/१२ द्या वनहक्क कायद्याची जनपक्षीय अंमलबजावणी करा, शेतकर्यांचे संपूर्ण वीजबिल माफ करा, उत्पादन खर्चात विजबिलाचा समावेश नसल्यामुळे वीजबिल मोफत द्या. आदी मागण्यासाठी या शेतकरी परिषदेला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व आपल्या न्याय हक्काच्या मागण्या पदरात पाडून घ्याव्यात असे आवाहन शेतकरी संघटनेचे सुकाणू समितीच्या वतीने करण्यात आले आहे.