जळगाव । चालु वर्षीच्या रनिंग सिजन मध्ये जळगाव रनर्स ग्रुपचे सदस्य भारतात विविध ठिकाणी सहभागी होऊन यशस्वी होत आहेत. मुबंई चेंबूरची मान्सून मॅरेथॉन मध्ये रनर्स ग्रुपचे सद्स्य योगेश चौधरी (36मिनिट)अजित महाजन (71मिनिट), उमेश महाजन (71मिनिट), ज्ञानेश्वर बढे (72मिनिट), प्रा.शशांक झोपे (70मिनिट), संजय मोती (49मिनिट), आशिष पाटील (69मिनिट), वैभव लिंबडा (मिनिट), नंदकुमार पाटील (62मिनिट), यांनी ही 10 कि.मी.ची स्पर्धा पूर्ण केली व कर्नल दिलीप पांडे पुणे येथील निओ व्हिजन स्पर्धेत 10की.मी ची रन 51मिनिटात पूर्ण करून चौथे आले आहेत.
रनर्स ग्रुपचे 40 सदस्य पात्र
पवन गोंधुळे व डॉ.प्रशांत बडगुजर यांनी मुंबई येथील मीरा भाईंदर मॅरेथॉन ची 10 कि.मी.रन 60 व 74 मिनिटात पूर्ण केली. मुंबई-पुणे हायवेवर दरवर्षी अत्यंत कठीण जंगलातील दुरशीत मॅरेथॉनमध्ये या ग्रुपचे अॅड.सागर चित्रे(2तास18मि.),सचिन महाजन (2तास 23मि.) ,डॉ.नितीन पाटील(2तास 50मि.),गितेश मुंदडा (2तास 32मि.),डॉ.तुषार उपाध्ये(10कि.मी.,77मि), यांनी 21की.मी.ची हॉफ मॅरेथॉन विक्रमी वेळेत यशस्वी रीतीने पूर्ण केली. या विविध मॅरेथॉनमध्ये आपल्या वयाचा गटानुसार ठराविक वेळेत मॅरेथॉन पूर्ण केल्यास मुंबई येथील जगातील पाचवी मोठी मॅरेथॉन एस.सी.एम.एम. 2018 साठी स्पर्धक पात्र ठरत असतात. यात जळगाव रनर्स ग्रुपचे सर्व सहभागी सदस्य यशस्वी झाले आहेत. यासाठी या सगळ्या रनर्सना किरण बच्छाव, विक्रांत सराफ, निलेश भांडारकर, अविनाश महाजन, नरेंद्रसिंग सोलंकी,डॉ.विवेक पाटील,डॉ.प्रशांत देशमुख, डॉ.रवि हिरानी व रनर्स ग्रुपचे सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.