359 केसेस ; धडक मोहिमेमुळे प्रवाशांमध्ये उडाली खळबळ
भुसावळ- रेल्वे प्रशासनाने फुकट्या रेल्वे प्रवाशांविरुद्ध उघडलेल्या मोहिमेंतर्गत जळगाव रेल्वे स्थानकावर सोमवार, 24 रोजी अचानक विशेष तपासणी मोहित राबवत 359 केसेसच्या माध्यमातून एक लाख 77 हजार 175 रुपयांचा दंड वसुल केला. अचानक राबवण्यात आलेल्या या मोहिमेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली. मोहिमेंतर्गत एक्स्प्रेस गाड्या तसेच रेल्वे स्थानकांवरून प्रवास करणार्या प्रवाशांकडील तिकीटांची तपासणी करण्यात आली.
यांच्या उपस्थितीत कारवाई
वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबधंक आर.के.शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या मोहिमेत 28 तिकीट निरीक्षक व एक रेल्वे सुरक्षा बलाचा कर्मचारी सहभागी झाले. विना तिकीट प्रवास करणार्या 63 प्रवाशांकडून 28 हजार 355 रुपये दंड वसुल करण्यात आला तसेच आरक्षित डब्यात जनरल तिकीटावर प्रवास करणार्या 295 प्रवाशांकडून एक लाख 48 हजार 171 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. सामानाची बुकींगविना वाहतूक करणार्या एका प्रवाशाकडून 650 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. या मोहिमेत तिकीट चेकिंग स्टाफचे बी.एस.महाजन, मोहमद रफीक, उमेश कलोसे, एन.पी.पवार, एन.पी.अहिरराव, प्रशांत ठाकुर, ए.एस.गायकवाड, एम.के.श्रीवास्तव, एस.के.वर्मा, हेमंत सावकारे, पी.एम.पाटील, एम.के.राज, एस.वि.त्रिवेदी, एम.पी.नजराकर, वि.के.संचन, सी.आर.गुप्ता, एस.एन.चौधरी, एस.पी.मालपुरे, वी.डी.पाठक, एस.ए.दहिभाते, धीरज कुमार, वाय.डी.पाठक व सर्व तिकीट कर्मचारी सहभागी झाले.