जळगाव विमानतळावरुन वैमानिक प्रशिक्षणासोबत आता हेलिकॉफ्टर प्रशिक्षण- खासदार उन्मेश पाटील

जळगाव — केंद्र शासनाच्या विचाराधीन असलेल्या फ्लाईंग ट्रेनिंग अकॅडमी प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय नागरी उड्डायन मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन चर्चा करून जळगाव विमानतळाचा समावेश करण्याची विनंती केली होती. आजवर केलेल्या पाठपुराव्याला यश आले होते. नुकतेच दिल्ली येथील स्कायनेक्स एरीओ कंपनीस जळगाव येथे फ्लाईंग अकॅडमी सुरू करण्याचे काम सोपविण्यात आले असून सप्टेंबरपासून प्रत्यक्षात सुरू होणार असल्याने राज्यातील एकमेव वैमानिक प्रशिक्षण केंद्र लवकरच कार्यान्वित होणार आहे. आता येथून जेट सर्व्ह या कंपनीने हेलिकॉप्टर प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली असून येथुन हेलिकॉप्टर प्रशिक्षण देखील दिले जाणार असल्याने जळगाव विमानतळ हे राज्यात वैमानिक प्रशिक्षण हब ओळखले जाईल. अशी माहीती खासदार उन्मेश पाटील यांनी दिली आहे.

 

 

हेलिकॉफ्टर प्रशिक्षण दिले जाणार
जळगाव विमानतळावरुन वैमानिक प्रशिक्षणासोबत आता हेलिकॉफ्टर प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सूतोवाच एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन तथा जळगावचे माजी जिल्हाधिकारी संजीवकुमार यांनी यावेळी दिले. याप्रसंगी मा. पंतप्रधान नरेन्द्र मोदी, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिह पुरी यांचे सह केंद्र सरकारचे तसेच एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाचे आभार मानले. तसेच प्रशिक्षण केंद्रामुळे जिल्हयाच्या लौकिकात भर पडणार असून राज्यात जळगाव विमानतळ वैमानिकांचे हब म्हणून ओळखले जाणार आहे.

 

 

पाठपुरावा यशस्वी : प्रशिक्षण केंद्र लवकरच होईल सूरू
खासदार उन्मेश पाटील यांनी विमानतळ सल्लागार समितीच्या बैठका घेऊन यासंबधी वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि नागरी उड्डयन मंत्रालयाकडे दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटून जळगाव विमानतळ येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र मिळावे यासाठी प्रयत्न केले होते. यासाठी माजी जलसंपदा मंत्री गिरिशभाऊ महाजन, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, खासदार रक्षाताई खडसे यांचे सह सर्वच लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी महोदय तसेच जळगाव विमानतळ संचालक सुनील मोंगिरवार, विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य सर्वाचे मार्गदर्शन सूचना सहकार्य लाभले होते. तर जळगाव जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी नात्याने विमानतळ विकासासाठी अधीक मदत करावी अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी एअरपोर्ट अथॉरिटी चेअरमन संजीव कुमार यांच्या कडे व्यक्त केली होती.

जिल्ह्याच्या नावलौकिकात भर

राज्यातील एकमेव जळगाव येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असल्याने जिल्हावासियांसाठी आधीच आनंदाची बाब होती. आता जेट सर्व्ह या कंपनीने हेलिकॉप्टर प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली असून येथुन लवकरच हेलिकॉप्टर प्रशिक्षण देखील दिले जाणार असल्याने जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडणार आहे. कोरोनाची दुसरी लाट असताना देखील जलद गतीने सर्व निविदा प्रक्रिया राबवून या संस्थेला मान्यता पत्र देण्यात आल्याने जळगावच्या वैमानिक प्रशिक्षण केंद्राचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला असून लवकरच प्रत्यक्षात उभारणीला सुरुवात होणार असल्याचे खासदार उन्मेश दादा पाटील यांनी नवी दिल्ली येथुन सांगितले आहे.

जळगावला भेट द्यावी
संजीव कुमार यांच्या भेटीत त्यांनी खासदार उन्मेश पाटील यांच्या कडे जळगाव जिल्ह्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला.चाळीसगाव विभागाचे प्रांताधिकारी म्हणुन देखील त्यांनी काम केले आहे.तेव्हाच्या अनेक आठवण त्यांनी यावेळी खासदार उन्मेश पाटील यांच्याशी सोबत चर्चा करतांना सांगितल्या. यावेळी आपण जळगाव विमानतळ येथे भेट द्या अशी विनंती केली.