जळगाव : शहरातील एका भागातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. कुटुंबीय हे मूळ रहिवासी अकोला जिल्ह्यातील आहे. बांधकामाच्या निमित्त जळगावला वास्तव्याला आहे. शनिवार, 9 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. पीडीत मुलीच्या नातेवाईकांनी परीसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु ती कोठेही आढळून आली नाही. मुलीच्या आईने रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.