जळगाव शहरातील गणेश मार्केटला लागली भयानक आग … लाखोंचे नुकसान

जळगाव शहरातील केळकर मार्केट नजीक असलेल्या गणेश मार्केटला रात्री दहाच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये तीन साड्यांची दुकाने खाक झाली असून लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सारिका साडी सारिका टेक्स्टाईल आणि सारिका ड्रेस मटेरियल ही तीन दुकाने या आगीत खास झालीत.

 

या ठिकाणी दहाच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. आग इतकी भीषण होती की आगीने आजूबाजूच्या दोन दुकानांना देखील आपल्या वेलख्यात घेतले. आग लागल्या लागल्या नागरिकांनी तुर्तास अग्निशमन दलाला संपर्क साधला. लगेचच अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी हजर झाले. यामुळे आगीचा वेग नियंत्रणात आणण्यात दलाला यश आले.

 

अग्नीशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी घेतलेले अथक परिश्रम

अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी,अग्निशमन दलाचे कर्मचारी फायरमन- अश्वजित घरडे,वाहन चालक-नासिर अली शौकत अली,भिला कोळी,सोपान जाधव,नितीन बारी,तेजस जोशी वाहन चालक-युसुफ पटेल,निवांत इंगळे,संतोष पाटील,मोहन भाकरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली