जळगाव : घरासमोर उभी असलेली 70 हजार रुपये किंमतीची रीक्षा चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुका पोलिसात गुन्हा
घनशाम नगरात मानव शाळेजवळ रीक्षा चालक सुनील ऊर्फ एकनाथ अंबीकार (52झ) हे वास्तव्यास आहेत. मंगळवार, 19 एप्रिल रोजी सुनील अंबीकार यांनी नेहमीप्रमाणे रात्री त्यांची रीक्षा (एम.एच. 19 सी.डब्लू.0556) या घरासमोर उभी केली. दुसर्या दिवशी बुधवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास बाहेर जाण्यासाठी निघाले असता घरासमोर रीक्षा आढळली नाही. सुनील अंबीकार यांनी तालुका पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक उमेश ठाकूर करीत आहेत.