Thieves Stole An Eicher Truck From Jalgaon City जळगाव : शहरात दुचाकी वाहनांच्या सातत्याने चोर्या सुरू असताना मेहरुणमध्ये मात्र चोरट्यांनी आयशर ट्रकच लांबवल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मध्यरात्री लांबवला आयशर ट्रक
जळगाव शहरातील मेहरुण परीसरातील राम नगरात जावेद लतीफ पटेल हा तरुण वास्तव्यास आहे. त्याच्याकडे आयशर (एम.एच.19 सी.वाय.4846) हा ट्रक असून गुरुवार, 8 रोजी रात्री 11 वाजता तो नाशिकहून आला व त्याने आपला ट्रक सारा हॉस्पिटलच्या मुख्य रस्त्यावर लावला. ही संधी चोरट्यांनी मध्यरात्री साधली. शुक्रवारी सकाळी जावेद यांचे वडील दूध घेण्यासाठी गेले असता त्याने आयशर लांबवल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय अतुल वंजारी करीत आहे.