जळगाव:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आजपासून तीन दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. मात्र नागरिकांना या आवाहनाचा विसर पडल्याचे चित्र आज दिसून आले. भाजी बाजारात नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. तर आकाशवाणी चौकात देखील वाहनांची मोठ्याप्रमाणावर वर्दळ बघायला मिळाली.
जळगाव शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या प्रमुख पक्षांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. मात्र शहरातील नागरिकांनी या आवाहनाला फारसा प्रतिसाद दिला नाही. आज सकाळी बळीराम पेठ परिसर, फळ गल्ली, मायादेवी नगर परिसर याठिकाणी वस्तू व भाजी खरेदीसाठी गर्दी दिसून आली. तसेच आकाशवाणी चौकात देखिल वाहनांची वर्दळ बघायला मिळाली. चक्क वाहतूक पोलीसाला याठिकाणी नियंत्रण करावे लागले. एकूणच जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षानी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी पाठ दाखविली.