जळगाव – जळगाव शहरातील रस्त्यांना रस्ता म्हणावे कि शेतरस्ता अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे.ज्या रस्त्यांवर केवळ बैलगाड्याच चालू शकतात अश्या रस्त्यांवर माणसाने कसे चालायचे किवा आमची वाहने कशी चालवायची ? असा संतप्त सवाल जळगाव शहरातील नागरिक विचारत आहेत.
शहरात गेल्या अडीच वर्षापासून अमृत योजनेचे काम सुरु आहे.या कामामुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था अख्या राज्यात सर्वश्तृत आहे. ज्या रस्तांचे कारण पुढे करतच शिवसेनेने भाजपला शह देत महापालिकेत सत्ता पालट केला. निकृष्ट रस्त्यांमुळे महापालिकेत शिवेसेनेला अच्छे दिन आले मात्र सत्तांतराला २.५ महिने उलटूनही रस्त्यांना अजूनही अच्छे दिन काही आलेले नाहीत. शनिवारी सकाळी झालेल्या पहिल्या पावसामुळे हे रस्ते आणखी इतके खराब झाले आहेत कि त्या वरून कसे जायचे हाच प्रश्न जळगावकरांना पडला आहे. उद्या त्यावरून पैजा लागल्या तर नवल वाटू नये.