जळगाव शहरात 87 प्रजातींच्या 5031 पक्ष्यांची नोंद!

0

जळगाव। बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या कॉमन बर्ड मॉनेटरींग प्रोग्रॅमच्या वतीने सामान्य पक्षी गणना सर्वेक्षण उपक्रम राबविण्यात आल. पक्षी गणना शहरातील विविध आठ भागात करण्यात आली. या गणनेत 87 प्रजातींच्या 5031 पक्ष्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती कॉमन बर्ड मॉनेटरींग प्रोग्रॅम चे जिल्हा समन्वयक राजेंद्र गाडगीळ यांनी दिली. सावखेडा,मन्यारखेडा,मेहरूण तलाव, हनुमान खोर, निमखेडी,कानळदा रोड,ममुराबाद रोड,डॉ.शामाप्रसाद उद्यान ते शिवाजीनगर डाळफड या परिसरात ग्रीड पाडून ट्रांझिट लाईन पद्धतीने पक्षी गणना करण्यात आली.

सागरी बगळा, गडवाल आदींची अनुपस्थिती
मेहरूण तलाव व मन्यारखेडा पाणवठ्यावर पाणथळ पक्षांनी पूर्णपणे पाठ फिरवल्याचे या गणनेतून निदर्शनात आल्याचे गाडगीळ म्हणाले. मोरशराटी नेहमी 50 ते 80 च्या संखेने असायचा त्या पक्ष्याची पूर्ण अनुपस्थिती होती. मन्यारखेडीत नदी सुरय शेकडोंनी असायचे त्यांची संख्या फक्त सहाच 2भरली. युरेशियन चमचे,काळ्या डोक्याचा शराटी नेहमी येणारा व दीर्घकाळ थांबणारा सागरी बगळा,गडवाल,चक्रांग बदक,चक्रवाक,तरंग बदक अशा पक्षांची अनुपस्थिती होती.

अशी आहे पक्षांची गणना
सर्वात मोठी नोंद ही 474 लालबुड्या बुलबुलची झाली. पारवे – 343 ,सातभाई -310, मैना – 252 , सुगरणी -246 ,चिमण्या -236,गाय बगळे -214, होले – 185, कोतवाल -169, कावळे-157, कीर पोपट – 146, टिटवी – 121,भारतीय दयाळ – 120,ब्राह्मणी मैना -113 , राखाडी छातीचा वटवट्या – 108 ,साधा सातभाई – 80, आशियाई कावडी मैना – 73 ,पिवळ्या डोळ्याचा सातभाई – 76, तांबट – 47 एवढे भरले , प्लवा बदक मेहरूण व मन्यारखेडा मिळून फक्त 60 भरले.

शहरीकरणामुळे पक्षांच्या संख्येत घट
रस्ता रुंदीकरणात मोठ्या प्रमाणात तलावचे क्षेत्रफळ घटले आहे जळगाव शहराचा विस्तार मोठ्याप्रमाणात अत्यंत गतीने चारी दिशेनी होत असल्याने प्रचंड शेतजमीन व झाडे नष्ट होत असल्याने पक्षांची संख्या कमी होत आहे त्यामुळे एकूण आजच्या विकासनीती चा गंभीर विचार सर्वच थरातील नागरिकांना करावा लागेल हे या गणनेतून सूचित होत असल्याचे गाडगीळ म्हणाले.