जळगाव शहर पोलिसांच्या जाळ्यात अडकला अट्टल चोरटा : 11 दुचाकी जप्त

Thief Nabbed With 11 Stolen Bikes : City Police Performance जळगाव : चोरीच्या 11 दुचाकींसह आव्हाणी, ता.धरणगाव येथील चोरट्याच्या जळगाव शहर पोलिसांनी मुसक्या बांधल्या आहेत. पवन प्रेमचंद पाटील (कुंवर, 26) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना चोरट्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. सोमवार. 12 रोजी पवन हा कोर्ट चौकात दुचाकी चोरण्यासाठी आल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले. आरोपी नाशिक येथून दोन, सुरत येथून दोन तर जळगाव शहरातून चोरलेल्या सात दुचाकी काढून दिल्या.

यांनी केली कारवाई
ही कारवाई सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, हवालदार विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, प्रफुल्ल धांडे, राजकुमार चव्हाण, रतन गीते, तेजस मराठे, योगेश इंधाटे यांच्या पथकाने केली.