जळगाव: लग्नाचे आमिष दाखवुन वेळोवेळी महिलेवर शारिरिक अत्याचार केल्याप्रकरणी जळगाव सामाजिक न्याय भवन येथे कार्यरत असलेले सहायक समाज कल्याण आयुक्त योगेश पाटील यांच्यावर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या पत्नी व वडिलांविरोधात मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. रामानंद नगर पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडित ३० वर्षीय याच विभागात खाजगी नोकरदार असल्याचे समजते. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार डिसेंबर २०१८ ते ३ जून २०१९ या दरम्यान सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी त्यांच्या घरात लग्नाचे आमिष दाखवुन वेळोवेळी शारिरिक अत्याचार केला तसेच योगेश पाटील यांच्या पत्नी सिमा पाटिल हिने मारहाण केली व सुभाषराव पाटील यांनी पिडित व तिच्या आईला शिविगाळ करुन घराबाहेर हाकलुन दिल्याचे म्हटले आहे. त्यावरुन योगेश पाटील, पत्नी आणि वडिलांविरोधात सोमवारी २४ रोजी रात्री २.३१ वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे करीत आहे.