जळगाव। 27 वर्षीय विवाहितेचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. शाहिस्ता सैय्यद राजु ही कुराळे ता.पाचोरा ही विवाहिता 28 रोजी घरात गॅस पेटविला असतांना गॅसची नळी लिक होवून आगलागून जळाली. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परंतु उपचारा दरम्यान तीचा मृत्यु झाला.तिच्या पश्चात लहान तीन मुलं असून पती सैय्यद राजु हा शेतमजुरी करतो. मयत शाहिस्ताचे माहेर अजिंठा येथील आहे. तीला रुग्णालयात दाखल केल्या नंतर तीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली.