धुळे। धुळे शहरात चार निष्पाप तरुणांच्या हत्या घडवून आणणार्या ‘राजा’ चे शिपाई पदेडे यांना अचानक कंठ फुटला आहे. अर्थात शेवटच्या घटका मोजत असलेल्या राष्ट्रवादीत यांना त्यांचे नेते किंमत देत नाही. पक्षात यांचे भांडवल म्हणजे ‘आमदार’ विरूद्ध एवढी पटक-पटक करत आहे. माझ्या शिवाय करमत नसेल अस्वस्थता वाटत असेल तर माझा फोटो घरात लावा. जळीत कांड गुंड्या यांच्या हत्येशी राष्ट्रवादीच्या गोयरचा संबंध कसा ? संजय खेडेकर, सोमनाथ जाधव व निलेश जाधव, नवनाथ देवकाते यांच्या हत्या दिवसा ढवळ्या घडवून आणल्या की रात्री ? मी कुठल्या बिळात आहे हे, तुझ्या घरात विचारून घे. असा इशारा देऊन आमदार अनिल गोटे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
तरुणाच्या हत्या कुणी घडवुन आणल्या
‘गुंडगिरी मुक्त धुळे शहर’ हा माझा कार्यक्रम होता.धुळे शहरात चार-पाच निष्पाप तरुणाच्या हत्या कुणी घडवुन आणल्या.सट्टा जुगार मटक्याच्या पेढ्या लावून तरुणांना अवैध धंदे करण्यासाठी कुणी प्रवृत्त केले.रॉकेल, गॅस, सिलेंडर, डांबराचा काळा धंदा करायला लावून हप्ते गोळा करणारा कोण?दारु दुकानदारांची सुपारी घेऊन वकीली करणारा कोण?वाळु माफियांना सोडविणारा आणि गुंतविणारा कोण? असे अनेक प्रश्न आमदार अनिल गोटे यांनी आपल्या प्रसिद्ध केलेल्या पत्रकात मांडले आहेत.
मी संधी शोधत होतो
ज्या गोष्टीची मी संधी शोधत होतो ती आपोआप माझ्याकडे चालत आली आहे. आई-वडीलांचे संस्कार नसले की, वडील धार्यांचा देखील एकेरी उल्लेख केला जातो. गुड्ड्याची निर्घुण हत्या झाली. हत्या कोणाचीही समर्थनीय असु शकत नाही. शहरात दोन मोठे जळीत कांड घडवुन आणले, पालिकेच्या शंभर वर्षापासूनचे वसुली विभागाचे दप्तर जाळुन टाकले. दुसरे जळीत कांड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे रेकॉर्ड जाळून खाक झाले. त्यावेळेस राष्ट्रवादी-काँग्रेसची सत्ता होती. बँक आगीच्या भक्ष्यस्थानी जळुन राख होईपर्यंत अग्निशमण दलाचे बंब न येण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पालिका दप्तर जाळण्यातील मुख्य आरोपी गुड्ड्या हा होता.
काही प्रश्न उपस्थित
राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकाला खुले पत्रक आ.अनिल गोटें यांनी देऊन काही प्रश्न उपस्थित केले आहेत.आ.गोटे यांच्या जाहीरनामा आणि गुंडगिरी मुक्त धुळे शहर आदी विषयांवर या पत्रकात त्यांनी खुलासा मागितला होता त्याचा खुलासा आ. गोटेंनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केला आहे.त्यासोबत आ.गोटेंनी इतर प्रश्न उपस्थित केले आहेत. जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी केलेल्या आरोप-प्रत्यारोपाला चोख उत्तर देत आ.अनिल गोटे यांनी प्रकाशित केलेल्या पत्रकातून सर्व गोष्टींचा रितसर खुलासा धुळेकरांना झाला असून आता धुळेकर याची शहानिशा करतील.