अमळनेर :- तालुक्यातील जळोद येथील 47 वर्षीय दिलीप रामदास चौधरी याने सोमवारी पहाटे आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहून ठेवलेल्या चिट्टीत येथील जोशी पुरा भागातील बांधकाम व्यावसायिक आणि शिक्षक असलेला मनोहर रामकृष्ण सोनार आणि पारोळ्यातील पिंटू जैन या इसमाने प्लॉट खरेदी विक्री प्रकरणात आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी आपण आत्महत्या करत असल्याचे लिहून ठेवले आहे. त्यामुळे या दोघांना अटक होई पर्यंत दिलीप चौधरी यांचे शवविच्छेदन होऊ देणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांने घेतली होती, मात्र पोलिसांनी मनोहर सोनार यास चौकशी साठी ताब्यात घेतले आहे तर पिंटू जैन याना सायंकाळ पर्यंत ताब्यात घेतले जाणार आहे. त्यांनतर वातावरण निवळले व दुपारी चार वाजे च्या सुमारास जळोद येथे दिलीप चौधरी यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले.
जळोद येथील दिलीप चौधरी यांनी मनोहर सोनार आणि पिंटू जैन यांच्या कडून प्लॉट घेतला त्यापोटी पैसे दिले होते मात्र मनोहर सोनार चौधरी याना प्लॉट ही देत नव्हता आणि पैसे ही देत नव्हता. दरम्यान च्या काळात दिलीप चौधरी यांचा अपघात झाला होता. त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे ही नव्हते. त्यामुळे चौधरी सोनार यांच्या कडे पैसे किंवा प्लॉट मागत होते मात्र सोनार हा वारंवार वायदे करत होता. त्यामुळे हतबल झालेल्या दिलीप चौधरी याने आत्महत्या केली असल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.
दरम्यान याबाबत रात्री उशिरा पर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.दिलीप चौधरी यांनी मनोहर सोनार आणि पिंटू जैन यांच्या कडून हप्त्याने प्लॉट घेतला होता. त्यासाठी लागणारे सर्व पैसे दिले होते. मात्र त्याबदल्यात सोनार ना पैसे देत होते ना प्लॉट. वारंवार मागनी करून ही प्लॉट किंवा पैसे मिळत नसल्याने चौधरी यांनी आत्महत्ये चे पाऊल उचलले असे त्यांच्या घरांच्या चे म्हणणे आहे, त्यामुळे या मनोहर सोनार आणि पिंटू जैन यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी जळोद येथील नागरिक आणि नातेवाईकांनी केली आहे.
मनोहर सोनार कोण?
मनोहर सोनार हा जालना येथे शिक्षक होता, मात्र झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने आतापर्यंत अनेक मार्केटिंग कंपन्यांत भाग्य अजमावले होते. पाच सात वर्षा पूर्वी अतिशय हलाखी चे जीवन जगणाऱ्या या शिक्षकाने जमीन खरेदी विक्री सुरू केल्यानंतर अल्पावधीत अनेक गुंतवणूकदारांना गंडा घालत कोट्यवधी ची माया जमवली आहे. यात अनेक गरीब गुंतवणूकदारांच पैसा हडप केला आहे. त्याबळावर जोशी पुरा भागात त्याने एक टोलेजंग इमारत बांधली आहे.
मनोहर सोनार यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आर्थिक हलाखी ची होती. मात्र आता तो राजेशाही जीवन व्यतीत करत आहे. मोकळ्या भूखंडावर प्रार्तविधी करण्यास जाणारा सोनारकडे आता प्रत्येक रूम वातानुकूलित आहे.मनोहर सोनार याची शहरात आर्थिकपत नव्हती. मात्र शहरातील धुळे रस्त्यावरील साने गुरुजी विद्या मंदिर शाळेच्या रवींद्र धोंडू कोळी या शिक्षक वर्ग मित्राच्या मदतीने त्याने याच शाळेतील अनेक गुंतवणूकदार मिळवले. त्या बळावर सुरुवातीला शिरपूर रस्त्यावर त्याने एक शेत खरेदी केले होते त्यांनतर आवक वाढल्याने त्यांनी अनेक ठिकाणी शेत खरेदी करून लकी ड्रॉ पद्धतीने ग्राहकांना अमिष दाखवत प्लॉट विक्री सुरू केली आहे. त्याचा च बळी दिलीप चौधरी ठरला व त्याने पैसे व जागा मिळत नसल्याने आत्महत्या केली. दरम्यान याकामी साने गुरुजी विद्या मंदिर शाळेचे शिक्षक रवींद्र कोळी यांची पोलीस दिवसभर चौकशी करत होते.