जळोद येथे विकास कामांचे उद्घाटन

0

अमळनेर। तालुक्यातील जनतेने माझ्यावर मोठा विश्वास दाखवून आमदारकी बहाल केल्याने या भूमीत जनसेवा व विकास कामांची संधी मला मिळाली व म्हणूनच राष्ट्रीय पातळीवरील आदर्श आमदार म्हणून सन्मानाच्या पुरस्कार जनतेलाच समर्पित असल्याची भावना आमदार शिरीष चौधरी यांनी जळोद येथे विकास कामांचे उदघाटन व प्रवेशद्वार लोकार्पण प्रसंगी व्यक्त केली. जळोद येथे मोठ्या थाटात हा सोहळा पार पडला. यावेळी विकास कामांचे उदघाटन व प्रवेशद्वाराचे लोकार्पण आमदार शिरीष चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

सात रुपयांत आरओ शुद्ध पाणी
आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नातून गावाला जल शुद्धीकरणाच्या आर.ओ.प्लान्ट मिळाल्याने आता जळोद ग्रामस्थांना दररोज अवघ्या 7 रुपयांत 20 लिटर शुद्ध व थंडगार पाणी मिळणार आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमास जळोदसह परिसरातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते, सर्वांनी पुरस्कारबद्दल आमदार चौधरींवर अभिनंदनाचा वर्षाव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात व गावातर्फे सत्कार ही करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ जितेंद्र चौधरी, उपसरपंच शारदा कोळी यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प.सदस्य व्ही.आर.पाटील, सरपंच जळोद डॉ.जितेंद्र चौधरी, उपसरपंच शारदा कोळी, सरपंच दोधवद दिनेश परमार, प्रा अशोक पवार, किरण गोसावी, सुनील भामरे, पंकज चौधरी, माजी सरपंच दीपक साळूखे, संभाजी देशमुख, एम.डी. चौधरी, एन.डी. तात्या, हरीश कोळी, निबा कोळी, छोटू चौधरी, योगेश पाटील, हिरामण धनगर, शशीकांत साळूखे, रवींद्र भोई, उषा चौधरी, लक्ष्मीबाई भोई, जनाबाई भोई, हिरामण सोनवणे, श्रावण भिल, सुनीता पारधी, शरद पाटील, किरण चौधरी, नाना धोबी, दीपचंद भोई आदी मान्यवर उपस्थित होते.

गावात याप्रमाणे होणार कामे
यावेळी मराठी शाळेपासून ते बस स्टॅण्ड चौक डांबरीकरण, खंडेराव महाराज मंदिर सुशोभिकरण, ग्रामपंचायत ते सोसायटी काँक्रीटिकरण, नवीन पाणी टाकी, स्वतंत्र पाईप लाईन, भोई वाडा, मारोती चौक, शेटे गल्ली, खालचा कोळी वाडा यांचे काँक्रीटिकरण, दलित समजासाठी समाज मंदिर, बसस्थानका. पासून ते वस्ती कडे काँक्रीट रस्ता, जळोद ते गंगापुरी शेतरस्ता खडीकरण, दोन हायमस्ट लॅम्प, विशेष गावं हागणदारी मुक्त करण्यासाठी सहभाग घेवून 80 टक्के काम पूर्ण, अल्पसंख्याकीक वस्ती साठी काँक्रीटीकरण शौचालय, महिला जनरल शौचालय, महिला साठी स्वतंत्र पिकअप बस स्टँड, आरओ प्लांट, संपूर्ण गावात एल इ डी लाइटची सुविधा आदी कामाचे उद्घाटन करण्यात आली.