जवखेडा खुर्दला वीज कर्मचार्‍यास मारहाण : वीज चोरी रोखल्यातून प्रकार

Electricity Worker brutally beaten up by farmer who Went to Catch Electricity Thief : Jawkheda Khurd incident एरंडोल : तालुक्यातील जवखेडा खुर्द येथे वीज चोरी रोखण्यासाठी गेलेल्या वीज कंपनीचे कर्मचरी इच्छानंद पाटील यांना संशयीत मनोज प्रताप पाटील यांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. या घटनेत वीज कर्मचार्‍याच्या डोक्याला जबर मार बसला असून हात फ्रॅक्चर झाला आहे. जखमी कर्मचार्‍याला येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगावी हलविण्यात आले. या घटनेचा वीज कंपनी कर्मचार्‍यांनी निषेध करीत दोषीवर कारवाईची मागणी केली आहे.

वीज चोरी रोखताना केली मारहाण
एरंडोल येथील वीज कर्मचारी इच्छानंद पाटील व त्यांच्या सोबतचे कर्मचारी हे जवखेडा खुर्दला मंगळवारी वीज चोरी पकडण्यासाठी गेले असता संशयीत मनोज प्रताप पाटील यांच्या शेतातील हुक लावलेली वायर पकडली. यावेळी मनोज प्रताप पाटील (जवखेडा खुर्द) या शेतकर्‍याने वीज कर्मचारी अक्षय रमेश महाजन यास लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. अक्षय महाजन यांच्या डोक्याला मार व हाताला फ्रॅक्चर झाले असून त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे हलवले असता त्यांच्यावर उपचार करून जळगाव हलविण्यात आले.

एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल
वीज वितरण कंपनीचे कर्मचारी इच्छानंद पाटील, पंकज नारायण येवले, अमोल रमेश रामोशी, अक्षय रमेश महाजन, गजानन शंकर मराठे व इतर कर्मचारी हे जवखेडा खुर्द येथे वीज चोरी पकडण्यासाठी गेले असता वरिष्ठ तंत्रज्ञ अक्षय रमेश महाजन यांनी मनोज प्रताप पाटील यांच्या शेतातील त्यांनी अवैध जोडणी केलेली वायर काढली असता संशयीत मनोज प्रताप पाटील यांनी त्यांना मारहाण केली. एरंडोल पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. एरंडोल पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.