जवखेडा येथील जवान मथुरेत अपघातात ठार

0

एरंडोल । येथूनच जवळ असलेल्या जवखेडा खुर्द येथील रहिवाशी जवान मथुरा येथे झालेल्या अपघातात ठार झाला आहे. या घटनेमुळे जवखेडा गावात हळहळ व्यक्त होत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एरंडोल तालुक्यातील जवखेडे खुर्द येथील जवान गणेश मुक्त्यारसिंग पाटील यांचे आयकोरसिंग रेजिमेंन्ट मथुरा इंनोरमेन्ट 2003 च्या बॅचमध्ये निवड होवून देशसेवेत रूजू झाले. त्यानंतर त्यांनी पंजाब, जम्मू काश्मिर आणि उत्तरप्रदेश या ठिकाणी देशसेवा उत्तमरित्या बजावली होती. जवान गणेश पाटील याचे दोन वर्षापुर्वीच धुळे तालुक्यातील दह्याने येथील मुलीशी लग्न झाले असून त्यांना दीड वर्षाचा मुलगा देखील आहे. मुक्त्यारसिंग पाटील यांचे एकत्रीत कुटूंब असून कुटूंबातील चार जण जवान म्हणून देशाचे रक्षण करित आहे. त्यातील दोघे जण सेवानिवृत्त झाले आहे. मयत गणेश पाटील हे माजी सरपंच मुक्त्यारसिंग उदेसिंग पाटील यांचे सुपुत्र आहेत.