जवखेडे येथे नाला खोलीकरणाचा शुभारंभ

0

जळगाव । नाला खोलीकरांच्या कामांना मुळे पाणी अडवले जाऊन विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शेतकर्‍यांना व ग्रामस्थाना फायदा होणार आहे. जलयुक्त शिवार अभियान हे शेतकर्‍यां साठी उपयुक्त ठरत असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते ना. गुलाबराव पाटील यांनी केले. जवखेडे येथे 38 लक्ष निधी मंजूर असलेल्या 7 नाला खोलीकरनाच्या कामांचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे हे होते. जवखेडा तालुका जळगाव येथे जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने 38 लाखांची निधी 7 नाल्यांच्या खोली करणाच्या कामांसाठी मंजूर आहे. यामुळे 40 ती.सी.एम.पाणीसाठा वाढणार असून सुमारे 110-120 विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. सदर नाला खोलीकरण कृषी, लगूसिंचन, भूवैज्ञानीक या यंत्रणांमार्फत कामे करण्यात येणार आहे.