Midnight theft of buffalo pardus along with four Jersey Cows : Panic among herdsmen in Jawkheda अमळनेर : अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील शेतकर्याच्या मालकीच्या चार जर्सी गाय आणि दोन म्हशीचे पारडू चोरट्यांनी वाहनात कोंबून चोरून नेले. या प्रकरणी सोमवार, 26 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पशूधन चोरी करणारी टोळी सक्रिय
अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील शेतकरी गोकुळ धोंडू पाटील (63) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मालकीच्या 50 हजार रुपये किंमतीच्या चार जर्सी गाय, दोन म्हशींचे पारडू आणि ईलेक्ट्रिक काटा असा मुद्देमाल (एम.एच. 02 बी.डी. 2428) यामधून चोरून नेल्याचे सोमवार, 26 डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास समोर आले आहे. या प्रकरणी गोकुळ पाटील यांनी सोमवारी 26 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता अमळनेर पोलिसात तक्रार नोंदवली. तपास पोलिस नाईक कैलास शिंदे करीत आहे.