जवानांकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

0

श्रीनगर – सीमारेषेवर भारताचा शेजारी पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. आज सकाळी श्रीनगरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. फातेह कादल परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दरम्यान एक पोलीस कर्मचारी शहीद झाला आहे.

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सकाळपासून चकमक सुरू झाली आहे. श्रीनगरमध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चकमकीदरम्यान संपूर्ण परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून कडेकोड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.