नवी मुंबई । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत स्वच्छता अभियानाचा नारा सुरु केल्या पासून प्रत्येक भारतीय नागरिक प्रयत्न करत आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणून 102 वाहिनी शीघ्र कृती दलाच्या जवानांनी आपले काम करतच खारघर परिसर स्वच्छ केले. तसेच स्वच्छतेप्रति फलक प्रसिद्ध करून जनजागृती केली. सहाय्यक कमांडर स्वातंत्रकुमार व योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर येथील पापडीचा पाडा, सेंट्रल पार्क व शीघ्र दल परिसर जवानांनी स्वच्छ केला.
तसेच हम सबका यही सपना, स्वच्छ भारत हि आपणा, देश भी साफ हो जिसमे सबका साथ हो, एक इंडिया क्लीन इंडिया असे फलक हातात जवानांनी घेऊन उत्कृस्ट कार्य केले व देशाप्रति प्रेम व्यक्त केले.