जवानांच्या सन्मानार्थ काळ्या फिती

0

लंडन । भारत विरूध्द पाकिस्तान असा रविवारी हॉकीचा सामना झाला.हा सामना खेळतांना भारतीय हॉकी संघाच्या खेळाडूंनी काळ्या फिती बांधल्या होत्या. शहीद भारतीय जवानांच्या सन्मानार्था व दहशतवादी हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी खेळाडूंनी या काळ्या फिती बांधल्या होत्या. भारतीय हॉकी संघाने एफआयएच विश्व हॉकी लीग सेमीफायनलमध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा विक्रमी 7-1 गोलने धुव्वा उडविला आणि ‘ब’ गटात अव्वल स्थान कायम राखले. पाकिस्तानचा पराभव करून भारतीय हॉकी संघाने सर्वाची मने जिंकलीच,

जवानाबद्दलचा आदर व्यक्त केला
हॉकी संघाने नेहमीच आपल्याला भारतीय लष्कारसंबंधी असलेला आदर व्यक्त केला आहे. तसंच दहशतवाद्यांकडून होणा-या भ्याड हल्ल्याचाही निषेध केला आहे.भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफने काळ्या फिती बांधल्या होत्या. ’काळ्या फित बांधून खेळण्याचा निर्णय सर्वांनी मिळून घेतला होता. याचबरोबर जम्मू काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी आम्ही प्रार्थना करतो’, असे हॉकी इंडियाचे महासचिव मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी सांगितले आहे.

कर्णधार मनप्रीत सिंह बोलला आहे की, ’आम्हाला मैदानावर जिंकून दाखवून द्यायचे होते की, आम्हाला फक्त आमच्या देशाचा अभिमान नाही, तर आमचा ज्याच्यावर विश्वास आहे त्यासाठी एकत्र येऊ खेळाच्या माध्यमातून लढू’.

पाकचे स्वप्न भंगल
भारताने अनुभवहीन पाकिस्तान संघाविरुद्ध खेळाच्या प्रत्येक विभागात वर्चस्व गाजवले. या पराभवामुळे पाकिस्तानचे विश्वकप स्पर्धेत स्थान मिळवण्याचे स्वप्न जवळजवळ भंगले. कारण या स्पर्धेतील हा त्यांचा सलग तिसरा पराभव ठरला.भारतातर्फे हरमनप्रीत सिंग (13 व 33 वा मिनिट), तलविंदर सिंग (21 व 24 वा मिनिट), आकाशदीप सिंग (47 व 59 वा मिनिट) आणि प्रदीप मोर (49 वा मिनिट) यांनी गोल नोंदवले, तर पाकिस्तानतर्फे एकमेव गोल उमर भुट्टा (57 वा मिनिट) याने केला. पाकचा या स्पर्धेतील हा पहिला गोल ठरला. या विजयासह भारताने उपांत्यपूर्व फेरीत यजमान इंग्लंड आणि ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाविरुद्धची लढतीची शक्यता टाळली.