पाचोरा । आमदार किशोर पाटील यांनी सन 2014 मध्ये सैनिकांच्या माता-पिता-पत्नी यांचा कृतज्ञता सन्मान सोहळ्यांचे आयोजन करून त्यांचा सन्मान केला होता. या सोहळ्याप्रसंगी पाचोरा-भडगाव मतदारसंघातील जवानांच्या निवासी इमारतीवर घरपट्टी करातून सूट देण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता माता मुख्यमंत्री महोदयाकडे जवानांना घरपट्टी कर माफ व्हावा, याकरिता प्रस्ताव दाखल केला होता. त्याचा पाठपुरावा करून बैठका घेतल्या. अखेरीस सैनिक, माजी सैनिक, वीरपत्नी व अवलंबित असणार्याच्या नावावरील निवास इमारती-घरावरील घरपट्टी पूर्णपणे माफ करण्याचा शासन निर्णय पारित झालेला आहे. त्यामुळे आमदार किशोर पाटील यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे
यांची होती उपस्थिती यावेळी बाळू पाटील, डी.टी.पाटील, दीपक चव्हाण, गणेश बेलदार, प्रकाश सूर्यवंशी, किशोर पाटील, धनराज पाटील, आर.डी.वाघ, इंद्रसिंग पाटील, विजय येवले, भास्कर पाटील, जितेंद्र पाटील, बबन कराळे, डी.ओ.पाटील, दिनकर पाटील, भास्कर शहाणे, भरत परदेशी आदी माजी सैनिक उपस्थित होते. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी 1 एप्रिल 2017 पासून आजी-माजी सैनिकांची घरपट्टी माफ केल्याबद्दल, दिलेले आश्वासन पूर्ण केल्याबद्दल, माजी सैनिक संघ जळगाव यांनी कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, मुख्याधिकारी किरण देशमुख यांचा शाल,पुष्पहार देऊन सत्कार केला व आभार मानले.