जवानांना दोनशे राख्या पाठविल्या

0

तळेगाव दाभाडे –  देशाचे संरक्षण करणार्‍या जवानांकरिता राष्ट्रीय शाळा नवीन समर्थ विद्यालयाच्या इयत्ता 9 वी व 10 वी च्या विद्यार्थ्याकडून रक्षाबंधनानिमित्त दोनशे राख्या पाठविण्यात आल्या.

राष्ट्रीय शाळा नवीन समर्थ विद्यालयातील स्काउट व गर्ल्स गाईडच्या विद्यार्थ्यांनी खरी कमाई या योजने अंतर्गत दोनशे राख्या स्वतः तयार केल्या व भारत भूमीचे रक्षण करणार्‍या वीर जवानांना पुण्याच्या ग्राहक पेठ संस्थेच्या माध्यमातून पाठविल्या. या उपक्रमाने वीर जवानांचे मनोबल वाढेल आणि आमची कृतज्ञतेची भावना त्यांच्यापर्यंत पोहचेल अशी आशा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

या उपक्रमात विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक कैलास पारधी, पर्यवेक्षक सुचेता फातरफोड, पांडुरंग पोटे, विवेक भगत, आशा आवटे, मच्छिंद कांबळे, शरद जांभळे यांनी मार्गदर्शन केले.