रावेत : देशाच्या संरक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करणार्या जवानांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी घोरपडी, पुणे येथील भारतीय सैन्य दलाच्या ग्रुपमध्ये असलेल्या जवानांना राख्या बांधल्या.
जवानांनी व्यक्त केली भावना
आपण आपल्या कुटुंबापासून लांब असताना समाजातील लोकांकडून आपलीदेखील दखल घेतली जाते, अशी भावना अनेक जवानांनी याप्रसंगी बोलून दाखवली. या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रा. वैशाली वाघुले, प्रा. अंजली कुलकर्णी, प्रा. मधुरिना कोळकर यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या. मिलिटरी टुरिझम यांच्या मदतीने हा कार्यक्रम पार पडला.