जवानांशी गैरवर्तन करणार्‍यांना गोळ्या घाला

0

सोनिपत । देशाविरोधात कृती करणार्‍या आणि जवानांशी गैरवर्तन करणार्‍यांना गोळ्या घालून मारले पाहिजे, अशी तीव्र प्रतिक्रिया ऑलिंपिक पदकविजेता कुस्तीपटू योगेश्‍वर दत्त याने व्यक्त केली आहे.
केंद्रीय राखील पोलीस दलातील (सीआरपीएफ) जवानाला श्रीनगरमध्ये काही युवकांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय फलंदाज गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांनीही या प्रकाराबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
योगश्‍वर दत्त म्हणाला, जे घडले ते अत्यंत चुकीचे आहे. आमच्या जवानाचा अपमान करण्यात आला. त्यांच्यावर क्रूरपणे हल्ला करून त्यांचे हेल्मेटसुद्धा रस्त्यावर टाकून देण्यात आले. हे पाहणे अतिशय अपमानकारक व दुःखद आहे. असे वर्तन करणार्‍यांना गोळ्या घालून मारले पाहिजे.