जवानों, आप हो देश की बैसाखी… बांधो राखी

0

जळगाव । भारतीय जवानांसाठी कश्मिर खोर्‍यात मुक्तीतर्फे राख्या पाठविण्याचा अनोखा उपक्रम घेतला असून सामाजिक संस्था, कार्यकर्ते, नागरिक यांनीही आपआपल्यापरिने राख्या किंवाभारतीय जवानांसाठी सुदृढ, जीवनाकरीता प्रार्थना करावी असे आवाहन आमदार सुरेश भोळे, डॉ.धमेंद्र पाटील, डॉ.मेहुल पटेल, गोपाल वालेचा, एस.पी.गणेशकर, मुकुंद गोसावी आदींनी केले आहे.

जवानांना रक्षासुत्र पाठवा..
रक्षा बंधन तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त राख्यांची ममतामय स्नेह भेट सामाजिक सेवाभावी संस्था मुक्ती फाऊंडेशनच्या माध्यमाने तर राष्ट्रसेवा आर्या व बॉर्डरलेस फाऊंडेशनच्या माध्यमाने सहयोगाने पाठविण्यात येत आहे. सध्या देशावर शत्रू राष्ट्रांचा निशाना असून आपले भारतीय जवान डोळ्यात तेल घालून अहोरात्र राष्ट्रहितार्थ सेवा बजावत असतांना आपल्या भारतीय संस्कृतीचा ठेवा रक्षा सुत्र (सुताचा दोरा) पाठवून त्यांचा सुदृढ, निरोगी जीवना करीता सार्‍या भारतीयांनी सिमेवर राख्या पाठवून प्रार्थना करावी असे आवाहन करण्यात आले आहे.