जवान चंदू चव्हाणच्याहस्ते आजींच्या अस्थींचे विसर्जन

0

धुळे । पाकिस्तानच्या तावडीत असल्याची बातमी ऐकून जवान चंदू चव्हाण यांच्या आजीला ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. शनिवारी चंदू आपल्या घरी परतल्यावर रविवारी नाशिक यथे जाऊन रामकुंडात आपल्या आजीच्या अस्थींचे विसर्जन केले. त्यावेळी चंदू चव्हाणला अश्रू अनावर झाले होते. सर्जिकल स्ट्राईक नंतर चुकून जवान चंदू चव्हाण हा पाकिस्तानच्या सीमेत गेल्यामुळे पाकिस्तानच्या लष्कराने त्याला ताब्यात घेतले होते. हि बातमी आजीला माहित झाल्यावर त्यांना हृदय विकाराचा झटका आला व त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

परंतु त्यावेळी चंदू पाकिस्तानात असल्यामुळे आजीच्या अंत्यसंस्काराला येऊ शकला नव्हता. त्यामुळे चांदूच्या परिवाराने आजीचे अस्थिविसर्जन चंदू घरी परत आल्यावर करण्याचे योजिले होते. त्यानुसार चंदू शनिवारी बोरविहिर येथे घरी आल्यावर रविवारी नाशिक येथे जाऊन रामकुंडात आजीच्या अस्थींचे विसर्जन
करण्यात आले.