जवान चंदू चव्हाण यांची नोकरी सोडण्याची इच्छा

0

पुणे । पाकिस्तानच्या कैदेतून सुटका झालेले जवान चंदू चव्हाण यांनी आपली सैन्यातील नोकरी सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार चव्हाण यांनी वरिष्ठांना पत्र लिहून ही विनंती केली आहे.मुळचे धुळ्याचे असलेले चंदू चव्हाण (24) यांच्यावर सध्या पुण्यातील मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

भारताने सर्जिकल स्ट्राईक केला होता त्या दिवशी म्हणजे 29 सप्टेंबर 2016 रोजी चव्हाण यांनी चुकून एलओसी पार केली होती. त्यांनतर चार महिने ते पाकिस्तानच्या कैदेत होते. तेथे त्यांचे अतोनात हाल करण्यात आले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. भारतात परतल्यानंतर त्यांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागेल शिवाय त्यांना शिक्षाही सुनावण्यात आली. नंतर त्यांना अहमदनगरच्या लष्करी प्रशिक्षण केंद्रावर पाठणवण्यात आले. आता त्यांना हॉस्पिटलमध्ये मनोचिकित्सा वॉर्डात ठेवले आहे.