जळगाव । जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव येथे शैक्षणिक वर्ष 2018 साठी निवड चाचणी परीक्षा 7 जानेवारी, 2018 रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर, 2017 असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य वे. नारायण राव यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
जवाहर नवोदय विद्यालय हे भारत सरकार संचलित उइडए पाठयक्रम असणारे ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी दर्जेदार अद्यावत शिक्षण देणारे जिल्ह्यातील एकमेव निवासी विद्यालय आहे. प्रवेशासाठी होणारी निवड चाचणी परीक्षा पात्र ठरल्यास इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत मोफत शिक्षणाची व्यवस्था या शाळेत आहे. ही निवड चाचणी परिक्षा 7 जानेवारी, 2018 रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नियोजित परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर मधून पालकांनी भरण्याचे आवाहन साकेगाव येथे नवोदयाचे प्राचार्य यांनी केले आहे.