जव्हारमधील रस्त्यांची दयनीय अवस्था

0

जव्हार । जव्हार नगर परिषद हद्दीत रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मुख्य रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहनांना व नागरीकांना चांगलास त्रास सहन करावा लागत आहे. नेहरू चौक ते पाचबत्ती रस्ता इतका खराब झाला आहे की, तेथे वारंवार दुचाकींचे अपघात होत आहेत. तर वासु जोशी येथुन या रस्त्याचे कॉक्रिटी करण करणे करीता रस्ता उखडून ठेवला आहे. गेल्या महिन्या भरापासुन काहीच काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे पुर्ण रस्त्यावर परीसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासने तेथे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप आता नागरीकांमधून होत आहे. त्यामुळे ठेकेदार जेव्हा वेळ मिळेल तेव्हाच काम करू अशा पवित्र्यात असल्याचे बोलले जात आहे.

खड्ड्यांमुळे दररोज होताहेत छोटे मोठे अपघात
तसेच सार्वजनिक बांधकाम कार्यालया समोरील रस्त्यावर मोठ मोठे खडडे पडल्यामुळे दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे नागरीकांच्या समस्या शहरात वाढत चालल्या आहेत. वरील सर्व कामांच्या निवादा प्रक्रिया गेल्या पाच-सहा महिंन्यापुर्वीच पार पडलेल्या आहेत. मात्र मध्यंतरीच्या काळात फोडाफोडीच्या राजकारणात सदस्य संख्या पुर्ण होत नव्हती म्हणून सर्वसाधारण सभा झाल्या नाहीत, त्यामुळे निविदांना मुजंरी मिळालेली नाही, या सगळ्या राजकारणांमुळेच विकसाला खिळ बसुन नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. त्यात जव्हार नगर परिषदेच्या सार्वत्रीक निवडणूक कार्याक्रम जाहीर झाल्यामुळे दि. 14 डिसेंबरपर्यत आचांरसहिता असल्यामुळे कामे आणखी रेंगाळणार आहेत. शहराचा विकासाच्या दृष्टीने पाहाणारे राजकारणी निवडणून आल्यानंतर फक्त स्वत:चे हित नबघता शहराच्या विकासाकडे लक्ष केंद्रित केल्यावरच ऐतीहासीक वारसा लाालेल्या जव्हार शहराचा खरा विकास होईल.