जव्हारमध्ये घरांची जमीन दुभंगली, तडे पडले

0

जव्हार (संदीप साळवे) : जव्हार शहराला लागून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या चोथ्याचीवाडी पाड्याभोवती व राहत्या घरात लांबच लांब तडा गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या पाड्यातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या चोथ्याच्यावाडीत माळीची पुनरावृत्ती होते कि, असा भीतीच्या सावटात या चोथ्याच्यावाडीतील नागरिक भयभीत झाले असून, ज्या घरांना तडा गेल्या आहेत. असा घरातील नागरिकांनी आपले घरे सोडून दुस-यांच्या घरी वस्ती राहायला लागले आहेत.

जव्हार तालुक्यातील व शहरालगत असलेला गावं चोथ्याचीवाडी आहे. गेल्या आठवडा भरापासून मुसळधार पाऊस सुरु होता. मंगळवारच्या रात्री ३ वाजेच्या दरम्यान घरात अचानक जमीनीला लांब तडा गेली. परंतु येथील नागरिकांना वाटले की, ओल्या जमिनीमुळे ही आपल्या घरातील जागा फाटली असेल असे वाटले. मात्र येथील नागरिक सकाळी उठल्यावर चोथ्याच्यावाडी परिसराभोवती सगळीकडे जमिनीला मोठ्या लांबच लांब तडा पडल्याचे नागरिकांना दिसले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असावी असे वाटायला लागले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. तसेच ज्याच्या घरात भेगा पडल्या आहेत. त्यांनी आपले राहते घर सोडून दोन दिवसांपासून दुस-यांच्या घरी झोपायला जात असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.

चोथ्याच्यावाडीत ६५ घरांची लोकवस्ती राहत आहे. जेथे लांबच लांब तडा गेल्या आहेत. तेथील लोकवस्ती गेल्या ८ ते १० वर्षपासून १५ घरांची नवीन वसाहत आहे. ज्या चोथ्याच्यावाडीतील घरांना व घरांभोवती तडा गेल्या आहेत. त्या घरांपासून उंच डोंगर टेकडया असून, टेकडीवर जव्हारच्या राज्याचा राजवाडा आहे. या चोथ्याच्यावाडीलगत डोंगर दरीतून वळणघेत झापकडे जाणारा मेन रस्ता आहे. तसेच जेथे घरांना भेगा पडलेल्या आहेत. तेथील सर्वच घरे डोंगर टेकड्यांना लागून लोकवस्ती राहत आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या मनात माळीणची घटना आठवून भीती निर्माण झाली आहे.

चोथ्याच्यावाडीतील घरांना व गावाभोवती भेगा पडून तडा गेल्या आहेत. येथील घरात पायाने दाब दिला तरी जमीन आता जाते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे नागरिकांना वाटून अजूनही भीतीच वाटत असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच ज्या घरांभोवती तडा गेल्या आहेत. ती जागा गावठाण नसून वन विभागाची आहे. त्यामुळे त्यांचे गावठाण जागेत स्थलांतर करावे अशीही मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

चोथ्याच्यावाडीत लांबच लांब मोठ्या तडा गेल्यामुळे जव्हार तहसीलदार येथील आपात कालीन व्यवस्था व तलाठी यांनी या घटनेचा पंचनामा करून जव्हार तहसीलदार यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच चोथ्याच्यावाडीत कशामुळे तडा गेल्या आहेत. याचा पंचनामा करून वरिष्ट तज्ञांकडे पाठवल्याचे सांगितले.

आम्हला रात्री वाटलं कि, पावसामुळे झालं असेल परंतु सकाळी पाहिल्यावर घराभोवती सगळीकडे लांबच भेगा पडल्या आहेत. म्हणून आम्हला भीती वाटत आहे. आम्ही आमच्या घरात न राहता आमच्या मुलांना घेवून दुस-यांच्या घरी झोपायला जातो.
– आदिवासी रहिवाशी महिला- निर्मला बात्रे.

चोथ्याच्यावाडीत जेथे जमिनीला तडा गेल्या आहेत. येथील लोकवस्ती ही वन विभागाच्या जागेत राहत आहे. त्यामुळे येथील कुटुंबांची घरे हलवून गावठाण जागेत त्यांचे स्थलांतर करावे. त्या कुटुंबांना घरे बांधण्यासाठी आदिवासी विकास विभागाने मद्दत करावी. त्या कुटुंबांचा कायमचा प्रश्न मिटेल. नाहीतर येथील कुटुंबांना दरवर्षी भीतीच वाटेल.
– माजी जिल्हा परिषद सदस्य- श्रावण खरपडे.