जव्हारमध्ये नगरसेवकांच्या 17 जागांसाठी 101 अर्ज

0

जव्हार । जव्हार नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अंतिम दिवशी दुपारी तीन वाजे पर्यत नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख असल्यामुळे कार्यालयात उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. नगरसेवकांच्या 17 जागांसाठी एकुण 101 अर्ज दाखल झाले असुन नगराध्यक्ष पदासाठी 10 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव विधाते यांनी दिली.

यामध्ये एका उमेदवारेने दोन ते तीन अर्ज दाखल केलेले असल्यामुळे कुठल्या प्रभागात किती उमेदवार हे निश्‍चित अर्ज माघारी घेते वेळेस होणार आहे. तसेच नगराध्यक्ष पदाकरीता एकुण 9 उमेदवारांनी 10 अर्ज भरलेले आहेत. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी जव्हार प्रतीष्ठान कडून प्रतीष्ठानचे अध्यक्ष भरत पाटील त्यांचा मुलगा मोहित पाटील व मुस्लिम सेल अध्यक्ष जहिर (बबला) शेख यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहेत, तर शिवसेनेकडून चंद्रकांत पटेल, आय. कॉग्रेस कडून धनंजय खेडकर, तर सामाजीक कार्यकर्ते अलताफ शेख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे. तसेच 71 वर्ष वयाचे माजी नगरसेवक घाची मोहंमद हाजी यांनीही नगराध्यक्ष पदाकरीता उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्यामुळे आता प्रभाग प्रमाणे उमेदवारी निश्‍चितीही 30 नोव्हेंबर रोजी अर्ज माघारी घेण्याच्या वेळेच होणार आहे.

ऐतिहासिक परंपरा असलेल्या जव्हार नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक 13 डिसेंबरला होणार आहे. नगरपरिषद स्थापन होऊन 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. यंदा नगरपरिषदेचे शतक महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. त्यातच नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक लागली आहे. या निवडणूकीसाठी जव्हार प्रतिष्ठान व भाजप युतीने पहिल्यांदाच आव्हान उभे करून रंगत वाढवली आहे. यावेळी पहील्यांदाच थेट मतदारांकडून नगराध्यक्ष निवडून दिला जाणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.