जव्हार – जव्हार शहर हे ऐतीहासीक व पर्यटन स्थळ आहे. मात्र येथे पर्यटन विकास पाहिजे तसा झाला नसल्यामुळे येथे नगर परिषदेच्या माध्यमातून विकास होऊन येथील पर्यटन स्थळे विकसीत करण्याकरीता विविध कल्पना जव्हार प्रतिष्ठानचे अध्यक्ष भारत पाटील यांनी केल्या असुन शनिवारी हनुमान पॉईट येथे हनुमान पॉँईट ते मुंगीचामाळ या टेकडी पर्यत रोप वे करण्याकरीता खाजगी रोप वे तज्ञांना बोलवून सर्व्हे करण्यात आला आहे. यावेळी मुंबईहुन आलेले रोप वे तज्ज्ञ, भारत पाटील, नगरसेवक गिरीष मुकणे, मुद्दस्सर मुल्ला, जहिर (बबला) शेख, ईमरान लुलानिया, घाग गुरूजी, आसीफ शेख, जावेद शेख आदि उपस्थित होते.
आलेल्या तंज्ञांनी येथे रोप वे साठी जागा योग्य असुन, रोप वे जवळ जवळ एक ते दिड किलो मिटरचा होऊ शकतो, ते करता येऊ शकते असा हिरवा कंदील दिला. यामुळे येथे पर्यटकांना एक नविन पॉँईट व येथील निर्सगरम्य वातावरणाचा आनंद लुटता येईल व जव्हारच्या दृष्टीकोनातून ही खूपच आनंदाची बातमी असल्याचे पाटील यांनी सांगितले.
तसेच हे विकसीत करण्याकरीता नगर परिषदेची तथा खजगी जागा मालकांची सहमती व इतर मान्यता लागणार आहेत, तसेच डॅम परिसरात बोटींग सुरू करणे, हॉर्स रायडींग सुरू करणे, या बाबी विकसीत करणे करीता ारत पाटील यांनी पुढाकार घेऊन याबाबत शासनाकडून पर्यटन विकास निधी आणण्याचा प्रयत्न करू व तसे शक्य नाही झाल्यास बी.ओ.टी. तत्वावर करता येईल का याबाबत सविस्त चर्चा करण्यात आली, त्यामुळे परिषदेचा उतपन्न वाढीसह मदत होईल व पर्यटकांनाही इतर बाबींचा आनंद घेता येईल.