जव्हार : जव्हार तालुक्यात गेल्या आठवडयापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे हजारो ईलेक्ट्रोनिक्स उपकरणे निकामी होत असुन याची भरपाई विज वितरण विभाग भरून देणार आहे का? असा संतप्त सवाल येथील ग्राहकांनी केला आहे. वीज वितरणाकडून गेल्या काही दिवसांपासुन वारंवार वीज खंडीत होत असल्यामुळे जव्हारकर हैराण झाले आहेत. कार्यालयाच्या भोंगळ कारभारावर मोर्चा काढावरच येथील कारभार सुधारेल अशा प्रतिक्रया नागरिक देत आहेत. शहराला डहाणू केंद्रातून वीज पुरवठा केला जातो, त्यामुळे रस्त्यात कुठेही वीज खंडीत झाल्यास थेट डहाणू ते जव्हार पर्यत वीज खंडीत होते. मात्र यंदा विजेचा लपंडाव मात्र काही जास्तच झाला असल्यामुळे नागरीक वैतागले आहेत. संगणक, भगर मील, फ्रिज, ओव्हन, एअर कंडीशन, आदि महागडे उपकरणांचे मोठ्याप्रमाणत यामुळे नुकसान होत आहे.