जव्हार : शासनाने शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून शाळा शिक्षणापासून वंचित राहणार्या मुलांना शिक्षणाची सोय करून, त्यांचे शिक्षण पूर्ण करणे हा शासनाचा उद्देश असून, शिक्षणापासून वंचित राहणार्याच मुलांना शिक्षण घ्यावे हा शासनाचा मूळ उद्देश आहे. मात्र हा शासनाचा मूळ उद्देश फेल ठरतांना दिसत आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, या आदिवासी तालुक्यातील ग्रामीण भागात अनके ठिकाणी रोडलगत, शेत, माळरानावर, नदीकाठी, शिक्षण वयोगटातील मुलं शिक्षण सोडून गाई, शेळ्या, म्हशी, सांभाळताना दिसत आहेत.
अनेक मुलं गाई, शेळ्या सांभाळत असल्याचे उघड
जव्हार, मोखाडा, विक्रमगड, हा आदिवासी ग्रामीण भाग आहे. या भागातील नागरिकांच्या अशिक्षितपणामुळे शिक्षण घेणार्या वयातील मुलं शिक्षण न घेता शाळा सोडून गाई, शेळया, म्हशीचा सांभाळ करतांना दिसत आहेत. शासनाच्या नियमानुसार शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून शिक्षणापासून वंचित राहणार्या. मुलांना त्यांच्या वयानुसार त्या मुलांना शाळेत शिक्षणाची व्यवस्था करून मुलांना शाळेत प्रवेश करून देणे, हे शासनाचा मूळ हेतू आहे. मात्र या ग्रामीण आदिवासी भागात अनेक मुलं शिक्षण न घेता, गाई, शेळ्या, म्हशी, सांभाळतांना दिसत आहेत.
शासनाचे पितळ उघडे
शासनाने शाळाबाह्य मुलांचा फेर तपासणी सर्वेक्षण करून शाळाबाह्य मुलांची शिक्षणाची सोय करावी अशी मागणी या भागातील आदिवासी नागरिक करीत आहेत. शासनाने शाळाबाह्य मुलांचे केलेले फेर संर्व्हेक्षणा शेकडो मुले आदिवासी ग्रामीण भागातील मूल शाळेत न जात घरची कामे करतांना दिसत आहे. त्यामुळे शासनाचे पितळ उघडे पडले आहे.