जव्हार (संदीप साळवे) : जव्हार तहसीलदार हे पदं गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. तसेच तहसीलदार कार्यालयातील पुरवठा नायब तहसीलदार व महसूल नायब तहसीदार यांचीही पदं रिक्त असल्याने जव्हार तहसीलदार कार्यालयाला कोन्हीच वाली नसल्याचे चित्र दिसत आहे. तसेच नागरिकांची शासकीय कामे वेळेत होत नसल्याने, खोळंबा निर्माण झाला आहे. त्यामुळे जव्हारच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढून कार्यालयाला टाळे ठोकण्याचा ईशारा माकपाचे जि. प. सदस्य रतन बुधर यांनी दिला आहे. तहसिलदारच नसल्यामुळे नागरिकांच्या विविध शासकीय कामांचा खोळंबा निर्माण झाला आहे. जव्हारच्या तहसील कार्यालयात शासकीय कामे वेळेत होत नसल्याने, शासकीय कामे व विविध दाखल्यांसाठी गैरसोय निर्माण झाली आहे.
जव्हार तहसिदारांचा पदभार वाडा तहसीलदारांवर
यापूर्वीचे जव्हारचे तहसीलदार पल्लवी टेमघर ह्या यापूर्वीच्या तहसीदार म्हणून कार्यरत होत्या. मात्र त्या चार महिन्यापूर्वी एका महिण्यासाठी ट्रेनींगला गेल्या त्यांची ट्रेनींगपासूनच बद्दली झाली. तेव्हापासून जव्हार तहसिदारांचा पदभार वाडा येथील तहसीलदार दिनेश कुराडे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे जव्हारच्या तहसील कार्यालयातील अनेक शासकीय कामे रेंगाळत आहेत. जव्हार तहसीलदार कार्यालयातील काही महत्वाचे शासकीय टपाल कार्यालयातील एखाद्या शिपाईला किंवा करकुनाला वाडा तहसीलदार यांच्याकडे घेवून जावे लागत आहे. त्यामुळे जव्हार तहसील कार्यालयातील विविध शासकीय कामे खोळंबल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.