जव्हार नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी राजकीय पक्ष सक्रिय

0

जव्हार : जव्हार नगरपरिषदेचा सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल 20 जुलैला वाजले आहे. त्या संदर्भात सर्वच राजकीय पक्षात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. आरक्षण सोडतीनुसार एकुण 8 प्रभागामधून आपपला उमेदवार निवडुन त्याची योग्यता ठरवण्याचे काम जोर धरू लागले आहे. या प्रभगतुन एकुण 17 जण भवितव्य आजमावणार आहेत. तसेच या आधी राष्ट्रवादी काँग्रेसने ही नगरपारिषदेवर एकहाती सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर बरेच वाद झाले व तीन महींन्याकरिता निवडणूक घेण्यात आली होती. मात्र या वेळेस जनता कोणाच्या बाजूने कौल देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला सर्व प्रभागांमधून मतदान
एकुण 8 प्रभागांसाठी 17 उमेदवारांकरीता आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये 50 टक्के महिला आरक्षणानुसार राखीव अनुसुचित जाती महिला – 1, अनुसुचित जमाती महिला- 3 व सर्वसाधारण – 3, नागरीकांचा मागास प्रर्वग – महिला -3, सर्वसाधारण-2, खुला प्रवर्ग महिला-2, सर्वसाधारण-3 अशा प्रकारे सोडत प्रक्रिया पार पडली. नागरिकांचा मागास प्रवर्ग मध्ये अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व खुला प्रर्वग सोडून सर्व ईतर मागसवर्गीय जातींचा समावेश असल्याची माहिती मुख्याधिकारी वैभव विधाते यांनी दिली. नगर परिषदेच्या निवडणूकीकरीता नगराध्यक्ष पदाकरीता खूला प्रवर्ग आरक्षीत करण्यात आला असुन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला सर्व प्रभागांमधून मतदान करण्यात येणार आहे.