जव्हार पालिका हद्दीत कुष्ठरोगासाठी सर्वेक्षण सुरू

0

जव्हार । जव्हार कुटीर रूग्णालय येथे राष्टलीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम राबविण्यात येत असुन जव्हार नगर परिषद हद्दीतील 128 संशयीत रूग्ण आढळले असुन यातील काही रूग्ण निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेले असल्याची माहिती कुष्ठरोग तंत्रज्ञ अवैद्यकिय सहाय्यक प्रभाकर दळवी यांनी दिली. केंद्रशासन कुष्ठरोग विभाग व राज्य शासन कुष्ठरोग विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने प्रधानमंत्री प्रगती योजनेंतर्गत पालघर जिल्हा कुष्ठरोग शोध मोहिम अभियान सुरू करण्यात आले असुन जव्हार कुटीर रूग्णालयात दि. 6 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर 2017 पर्यत हा अभियान सुरू आहे. याकरीता मृणाल नर्सिग अ‍ॅन्ड पॅरामेडीकल इंस्ट्ट्यिुट जव्हार यांच्या संस्थेतील विद्यार्थ्यांची शोध पथकात नेमणूक करण्यात आलेली आहे.

संशयित रुग्ण कुटीर रुग्णालयात तपासणीकरिता पाठवले
विद्यार्थी नगर पालिका हद्दीतील घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करीत असुन ज्यांच्या आंगावर कुष्ठरोगाची लक्षणे दिसल्यास त्यांना कुटीर रूग्णालयात तपासणी करीता बोलावण्यात येते. दि. 13 सप्टेंबरपर्यत एकुण 128 संशयीत रूग्ण आढळले असुन त्यांना कुटीर रूग्णालयात तपासणी करीता पाठविण्यात आलेले आहे. तसेच अंगावर दिसणारा फिकट, लालसर बधिर चट्टा, कानाच्या पाळ्या जाड होणे, चेहरा तेलकट, जाडसर दिसणे, त्वचेशी संलग्न मज्जा जाड व दुखजया असणे, हातातून वस्तू व चालताना पायामधुन चप्पल निसटणे या त्वचारोगाची लक्षणे कुष्ठरोगाची असु शकतात त्यामुळे सर्व्हेक्षणसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना सहकार्य करावे व दि. 21 सप्टेंबर पर्यत कुटीर रूग्णालयात संर्पक साधावा असे आवाहन वैद्यकिय अधिकारी डॉ. रामदास मराड यांनी केला आहे.