जव्हार मधे राबविला माणुसकीची भींत कार्यक्रम

0

पालघर (संतोष पाटील) – केळवे गावातील तरूणांनी एकत्र येऊन ‘माणुसकीची भिंत’ हा सामाजिक उपक्रम हाती घेतला.लोकांकडील चांगल्या स्थितीमधील कपडे एकत्र गोळा करून ते व्यवस्थित वर्गीकरण करुन खेड्या पाड्यातील गरजवंतापर्यत पोहचवणे हा उद्देश्य समोर ठेऊन सुरूवातीला केळवे गावासाठी सुरू करण्यात आलेला उपक्रम प्रचंड यशस्वी झाला, लोकांचा वाढता सहभाग तरूणांचा उत्साह आणि दानशुरांचे मदतीचे हात या मुळे उपक्रमाची व्याप्ती वाढली.

शिलेदारांच्या साथीने जव्हार तालुक्यातील अतीशय दुर्गम भातील तीन पाड्यांवर गरजु लोकापर्यत कपडे वाटप करण्यात आले.स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याचे मार्गदर्शन व उपक्रमातील स्वंयसेवकांचे श्रमदान तसेच योग्य नियोजन सर्वाचा सुरेख मिलापामुळे उपक्रम यशस्वी पार पडला.

या कार्यक्रमाला केळवे माणुसकीची भिंत उपक्रमातील स्वंयसेवक मिलिंद पाटील ,वैशाली पाटील ,प्रदिप बारी ,विलासिनी बारी ,मिलिंद देव मिलिंद चौधरी ,वैभव हि.पाटील,प्रथमेश प्रभुतेंडोलकर ,चिराग चौधरी,यश देव, हर्षल देव
महेश सावे,शिरीन चौधरी,अनिल हाटकर,राजेश्री हाटकर,जितेंद्र राऊत,अशोक राऊत इत्यादि मंडळी उपस्थित होती