जसलीनचा नवीन व्हिडिओ व्हायरल

0

मुंबई :कॉन्ट्रोव्हर्शिअल शो बिग बॉस १२मध्ये अनेक विचित्र जोड्या आले होते. त्यातलीच एक म्हणजे भजन सम्राट अनूप जलोटा आणि जसलीन मथारु. या दोघांनी जोडी म्हणून घरात प्रवेश केला होता. आता जसलीन घरात एकटी राहिली आहे. अनुप जलोटा घरातून बाहेर झाले आहेत. पण जसलीन एकटी असूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसून येत असते.

https://www.instagram.com/p/BqoSaYQA6eD/?utm_source=ig_embed

जसलीन गायनासोबतच डान्सही करते. असाच एक व्हिडिओ सध्या पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जसलीनच्या चाहत्यांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत जसलीन ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर डान्स करताना दिसतेय आणि गाणं सुद्धा तिचं गात असल्याचे दिसतंय.