जसा विचार तसा निर्णय आणि जसा निर्णय तशी कृती म्हणजेच गाडगेबाबा

0

शेंदुर्णी । येथे आचार्य गजानन गरुड यांच्या स्मृती व्याख्यान मालेत पहिले पुष्प प्राचार्य तेज निवळीकर(पुणे) यांनी 21 रोजी ‘संत गाडगे बाबा एक चालत बोलत ज्ञानपीठ‘ हा विषय घेऊन गुंफले, त्यांनी गाडगे बाबा यांचे जीवन चरित्र व तत्वज्ञान श्रोत्यांसमोर उलगडून सांगितले. आज गाडगे बाबांचे जीवन चरित्र शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातूनच समजू शकते, गाडगे बाबांनी आपल्या प्रबोधनातून स्वच्छते बरोबर समाजाच्या डोक्यातील घाण काढण्याचे काम केले आहे. जसा विचार तसा निर्णय आणि जसा निर्णय तशी कृती म्हणजेच गाडगे बाबा होय, समाजात गाडगे बाबा, बापू साहेब यांच्यासारखे माणसं हे समाजाची आई म्हणून समाजाची सेवा करतात. धर्म, जात, पंथ यांच्या अनिष्ठ रूढी परंपरा याच्या विरोधात कार्य करून पहिल्यांदा तुम्ही माणूस व्हा आणि माणसातील देव शोधावा, असे आवाहन केले.

संत गाडगेबाबा यांच्या जीवनकार्याला दिला उजाळा
संत गाडगे बाबा यांचे मूळ नाव डेबूजी यांचे आई वडील लहानपणी वारले. मामाने सांभाळ केला तेव्हा मामाची शेतजमीन सावकाराकडे गहाण होती डेबूजी सदर जमिनीत राबून धान्य पिकवायचे व आयते धान्य सावकार जबरदस्तीने घेऊन जायचा त्या सावकाराच्या अश्या वागण्याने गाडगे महाराज यांच्या मनात अन्याया विरुद्ध लाढण्याची जिद्द निर्माण झाली. त्यांनी सावकाराच्याविरुद्ध आवाज उठवून त्याची एकाधिकार शाही संतुष्ठात आणली व अज्ञान हेच गरिबीचे कारण आहे म्हणून लोकांना कीर्तनातून लोकशिक्षण देण्याचे कार्य केले त्यांना स्तुती व स्वार्थी वृत्तीबद्दल चीड असायची, स्वतःचा एकुलता एक मुलाच्या निधनाची बातमी कळली असताना सुद्धा लोकजागृतीसाठी करत असलेले कीर्तन चालूच ठेवले, आपले विचार निर्णयाने कृतीत आणून प्रत्यक्षात आचरण करणारे ते महान संत होते, त्यांना देवाचे अस्तित्व मान्य होते. परंतू देवाच्या नावावर होणारी कर्मकांड मान्य नव्हती त्यांच्यावर संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा प्रभाव होता ,स्पृश्य अस्पृश्यता त्यांना मान्य नव्हती स्वच्छतेतुन समृद्धी हा त्यांचा मंत्र केवळ बाह्य स्वच्छतेबद्दल नव्हता तर मनाची स्वच्छता हवी या विचाराचे गाडगे बाबा होते.

व्याख्यान मालेत श्रोत्यांची गर्दी
यावेळी व्याख्यान माला समितीचे आयोजक संजय गरुड यांनी नागरिकांना व्याख्यानमालेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आपल्या मनोगतात केले. व्याख्यान माला समिती प्रमुख सागरमल जैन यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. प्रमोद सोनावने यानी आभार मानले तर डॉ.भोळे यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी सोयगाव येथील माजी प्राचार्य भगवंत राव देशमुख, प्राचार्य डॉ. वासुदेव पाटील, प्राचार्य बी.जी. मांडवडे, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, गावकरी श्रोत्यांनी भरलेल्या व्याख्यान मंडपात मध्येच हास्याची खस खस पिकवत श्रोत्यांना दाद दिली. गेले 9 वर्षांपासून व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आहे.