जहागीरदारवाडीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

0

चाळीसगाव : शहरातील बामोशी बाबा दर्गाह मागे जहागीरदार वाडीत जुगार अड्डा सुरु असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील याना मिळाल्यावरून त्यांच्या आदेशाने आज दि 7 जून रोजी शहर पोलिसांनी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास छापा मारून जुगार खेळणार्‍या 6 जणांना जुगाराची साधने व 4410 रुपये रोख रकमेसह ताब्यात घेतले असून 1 जण मात्र फरार झाला आहे. याबाबत माहिती अशी शहरातील बामोशी बाबा दर्गाह मागे जहागीरदार वाडीतील झन्ना मान्ना व माळ पत्ता नावाच्या जुगार अड्ड्यावर पो नि रामेश्वर गाडे पाटील यांच्या आदेशाने शहर पोलीस ठाण्याच्या हवालदार बापूराव भोसले, पोलीस नाईक योगेश मांडोळे, अरुण पाटील, पो कॉ गोवर्धन बोरसे, नरेंद्र नरवाडे, गोपाळ बेलदार यांनी आज 7 जून 2017 रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास छापा मारून जुगार खेळणारे गणेश दिनकर पाटील जहागीरदारवाडी , पन्नालाल गेमु जाधव पाटणा, मधुसूदन अमरसिंग राजपूत, कैलास मधुकर कुलकर्णी दोघे विमानतळ, राजेंद्र रेवजी पाटील दत्त वाडी चाळीसगाव शिवाजी लक्ष्मण राजपूत (34) जहागीरदारवाडी चालीसगांव यांना ताब्यात घेतले असून त्यांचे कडून 52 पत्त्याचा कॅट व 4410 रुपये असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. यावेळी मंगलसिंग हनुमानसिंग राजपूत रा चाळीसगाव हा मात्र फरार झाला आहे. आरोपींना मुंबई जुगार ऍक्ट 12 अ प्रमाणे ताब्यात घेऊन त्यांची लायक जामिनावर मुकतात करण्यात अली आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रेमसिंग राठोड करीत आहे.