जांबे-आळंदी बस पुन्हा सुरू झाल्याने ग्रामस्थांना दिलासा!

0

आ. लक्ष्मण जगताप यांच्या सहकार्याने सेवा सुरू

पिंपरी : मागील सहा महिन्यांपूर्वी अचानक बंद करण्यात आलेली जांबे-आळंदी बस सेवा काल सोमवार (दि.23 रोजी) पुन्हा सुरूकेल्याने जांबे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशी संख्या कमी असून उत्पनाचे कारण पुढे करत ही बस सेवा काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आली होती. सध्या जांबे-डांगे चौक बस सेवा सुरू आहे. मात्र जांबे आणी आजूबाजूच्या वाड्या-वस्त्यांना चिंचवड, पिंपरी, भोसरी, आळंदी भागात जाण्यासाठी दळण-वळणाचे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. या परिसरात वारकरी सांप्रदायातील नागरिकांची संख्या जास्त असल्याने जांबे गावातून चिंचवड, पिंपरीमार्गे आळंदी बस सेवा सुरू झाल्याने सर्वांनाच मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी माजी उपसरपंच अनिल मगर यांनी सरपंच, उपसरपंच आणी ग्रामस्थांच्या मदतीने पाठपुरावा केला. चिंचवड विधानसभा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सहकार्याने ही बस सेवा पुन्हा सूरू करण्यात आली .

सोमवारी या बसची विधीवत पूजा करून बससेवा सुरू करण्यात आली. यावेळी सरपंच अंकुश गायकवाड, उपसरपंच शिला मगर, सदस्य गणेश गायकवाड, माजी उपसरपंच अनिल मगर, माजी उपसरपंच बबन गायकवाड, भगवान गायकवाड, राजेंद्र गायकवाड, राजू गायकवाड, संतोष बुचडे, राजाभाऊ विनोदे, रंजना गायकवाड, विजयराव गायकवाड, नवनाथ टेमगिरे, ह.भ.प. सुमन जगताप, भोसरी डेपो मॅनेजर केदारी व शिक्षक वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.