जळगाव । जांभूळ खरेदी केली नाही याचा राग आल्यावरून जांभूळ विकणारी दुकानदार महिलासह इतर तिन महिलांनी खरेदी करणार्या महिलेस मारहाण करून कानतील सोन्याची दागीनासह कान ओरफडल्याने कानास मोठी जखम झाल्याने तिघा महिलांच्या विरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलीस स्थानकासमोरील फुले मार्केटबाहेर जांभूळ टोकरी घेवून बसणार्या महिला कल्पना हिरामण जगताप (वय-42) यांच्याकडे फिर्यादी बिंदू सुरेंद्र भारद्वाज (वय-35) रा. गोविंदा रिक्षा स्टॉप ह्या जांभूळ घेण्यासाठी आल्या.जांभूळ विके्रत्या महिलेने एक जांभूळ खाण्यासाठी देवून जांभूळ निवडायला लागल्या. मात्र विके्रत्या महिलेने निवडून न घेता सरळ आहे तसे घेण्यास सांगितले. त्यावर बिंदू भारद्वाज यांनी जांभूळ घेण्यास मनाई केली. याचा राग जांभूळ विक्रेत्या महिला कल्पना जगताप यांच्यासह तिच्या दोन मुलींनी बिंदू भारद्वाज यांना मारहाण करत शिवीगाळ करत कानातील सोन्याची वस्तू ओरबडल्याने बिंदू भारद्वाज यांचा कान तुटला. यामुळे त्या गंभीर जखमी झाल्याने बिंदू भारद्वाज यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात आरोपी कल्पना हिरामण जगताप, ज्योत्सना सुनिल पगारे आणि करिस्मा हिरामण जगताप सर्व रा. गोविंदा रिक्षा स्टाफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चंद्रकांत कोसे हे करीत आहे.